शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये "भारतीय भाषा दिवस" संपन्न.
भारतीय भाषा दिवस"
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रदिप पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मा.प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे
मा.प्राचार्य कार्यक्रमाध्ये मनोगत व्यक्त करताना
उपस्थितांचे आभार व्यक्त करताना मराठा विभाग प्रमुख प्रा.एल.एन. पवार
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये "भारतीय भाषा दिवस" संपन्न*
*मिरज:* येथील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये थोर साहित्यिक चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांची जयंती *भारतीय भाषा दिवस म्हणून संपन्न करण्यात आली..
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे मा.प्रा.डॉ.प्रदिप पाटील (विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर) यांनी "भारतीय भाषा आणि भाषिक कौशल्य या विषयावर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी भारतीय भाषेचे स्थान विषद केले व भाषिक कौशल्यांचे मानवी जीवनाच्या विकासातील महत्त्व अधोरेखित केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान मा. प्राचार्य प्रो.डॉ. सतिश घाटगे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, "प्रत्येक भाषेचे सौंदर्य व तिच्या रचनेमुळे आहे . त्यामुळे प्रत्येक भाषेचे वेगळेपण अबाधित आहे. प्रत्येक भाषातील साहित्यिकांनी समाजाला आपल्या अनुभवाची नवनवीन दालने उघडून दिली आहेत. मराठी भाषेने दलित साहित्यासारखा नवीन साहित्यिक प्रकार संपूर्ण साहित्य जगताला दिला,
ह्या समारंभास सर्व विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी प्रमुख प्रा.गायकवाड वाय.एस. यांनी केले तर प्रमुख पाहुणे यांची ओळख प्रो.डॉ.एल.ए.पाटील यांनी केली. कार्यक्रमासाठी प्रा.निलेश जाधवप्रा.डॉ.एन.एम.देसाई यांनी योगदान दिले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पी.जी.पाटील मॅडम यांनी केलेमराठी विभाग प्रमुख प्रा. एल.एन.पवार यांनी उपस्थितांचे व सर्व मान्यवरांचे आभार मानले.