YCMOU केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मा.कार्याध्यक्ष, प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची महाविद्यालयास भेट
YCMOU केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मा.कार्याध्यक्ष, प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची महाविद्यालयास भेट
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मा. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट देऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी केंद्र प्रमुख मा.प्राचार्य प्रो.(डॉ.)एस.के.खाडे, डॉ.सुनिल भोसले-केंद्र संयोजक, डॉ.माणगावे मेहबूब, प्रा.संदीप पाटील, प्रा.निलेश जाधव यांनी उपस्थित राहून केंद्राच्या विविध उपक्रमांची व कामकाजाची माहिती सादर केली. त्यांनी YCMOU केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी तसेच केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला.
मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्राने प्रभावीपणे कार्य करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबतही त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थिकेंद्रित उपक्रमांना प्राधान्य देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या भेटीप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच YCMOU केंद्रातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मा. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या भेटीमुळे YCMOU केंद्राच्या कार्याला नवी दिशा व प्रेरणा मिळाली.