आरोग्य तपासणी शिबीर'
आरोग्य तपासणी शिबीर
शुक्रवार, दि.2 डिसेंबर, 2022 रोजी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज येथील मानसशास्त्र व हिंदी विभाग आणि 'सेवासदन लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज व यांचया संयुक्त विद्यमाने 'आरोग्य तपासणी शिबीर' पार पडले. सदर शिबीराचे उदघाटन महाविद्यालयाचे मा.प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब, रक्तगट, रँडम शुगर, ECG, डोळे तपासणी अशा स्वरूपाच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
*मिरज :* शुक्रवार, दि.2 डिसेंबर, 2022 रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज येथील मानसशास्त्र व हिंदी विभाग आणि 'सेवासदन लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने 'आरोग्य तपासणी शिबीर' पार पडले. सदर शिबीराचे उदघाटन महाविद्यालयाचे मा.प्राचार्य प्रो.डॉ.सतिश घाटगे यांच्या शुभ हस्ते झाले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये रक्तदाब, रक्तगट, रँडम शुगर, ECG, डोळे तपासणी अशा स्वरूपाच्या विविध तपासण्याकरून मोफत औषधोपचार करण्यात आले . या शिबिराचा लाभ जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी घेतला. तपासणी करण्यासाठी डॉ.रविकांत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली डॉ.दीपा पाटील, डॉ. किरण व श्री.सागर भोसले, श्री. ओंकार जाधव , श्री. इब्राहिम, श्री. विलियम सत्राळकर, श्रीमती. पूजा इत्यादी कर्मचाऱ्यांनी या तपासण्या केल्या. तसेच मुथूट फायनान्स कंपनी यांनी रक्त तपासणीची सोया केली. महाविद्यालयामध्ये या शिबिराचे आयोजन मानसशास्त्र विभागाचे प्रा.विक्रमसिंह भोसले यांने केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. यशवंत गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. निलेश जाधव यांनी केले. श्री.राहुल कदम यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष सहकार्य केले.



